Loading...

“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

नवी दिल्ली |  कलम 370 च्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना टोला लगावला आहे. 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ते लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत होते.

जे तुम्हाला 70 वर्षांमध्ये जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसामध्ये करुन दाखवलं. नव्या सरकारनं अवघ्या 10 आठवड्यांमध्ये ‘कलम 370’, तिहेरी तलाकबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...

कलम 370 रद्द करुन सरकारने वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकारण्याकडे एक पाऊल टाकलं. जुन्या व्यवस्थेमुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भ्रष्टाचार वाढला होता, असंही ते म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मोदींनी विरोधकांना लक्ष्य तर केलंच मात्र काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा देखील केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

विलासरावांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक, म्हणाला…

Loading...

-माझ्या गावाला तिन्ही बाजूने पूराचा विळखा पण…- नांगरे पाटील

-पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेनं गणवेश सक्ती करू नये- आशिष शेलार

Loading...