देश

काँग्रेस पक्ष ‘बेल गाडी’ बनला आहे; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

जयपूर | काँग्रेसचे अनेक नेते जामीनावर सुटले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा ‘बेल गाडी’ बनला आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र माेदींनी केली. ते जयपूरमध्ये केंद्र आणि राज्य लाभार्थ्यांच्या रॅलीत बोलत होते.

पाकिस्तानमध्ये घुसून लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण काँग्रेस पक्ष आमच्या लष्कराच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यामुळे असं राजकारण करणाऱ्याला जनता कधीच माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे नाव एेकताच काही मंडळी अस्वस्थ होतात. मोदी आणि वसुंधराजे यांच्या नावाचा उल्लेख येताच काहींना ताप येतो, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!

-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!

-खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या