देवांच्या कामात राक्षस विघ्न आणतात, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

कांगडा | देव जेव्हा चांगलं काम कारायचे तेव्हा राक्षस त्यात विघ्न टाकायचे आणि नंतर पराभूतही व्हायचे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केलाय. हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

कांगडा येथे प्रचारासाठी नरेंद्र मोदींची प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी काँग्रेस म्हणजे लाफिंग क्लब असल्याची टीकाही त्यांनी केली.

हिमाचल प्रदेशच्या विद्यमान सरकारनं, खाण माफिया, वन माफिया, ड्रग माफिया, टेंडर माफिया या राक्षसांना पोसलंय, त्यामुळे त्यांना पराभूत करा, असं आवाहनही त्यांनी केलं.