अयोध्या प्रकरणाचा संबंध लोकसभा निवडणुकीशी का लावता?

अहमदाबाद | 2019च्या लोकसभा निवडणुकीचा संबंध राम मंदिराशी का जोडता?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केलाय. राम मंदिराची सुनावणी 2019च्या निवडणुकीनंतर घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केली होती.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सिब्बल यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मात्र फेटाळून लावली. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलंय.

दरम्यान, बाबरी मशिद प्रकरणाला 25 वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बोलत होते.