लोकांमध्ये जा, सोप्या शब्दात अर्थसंकल्प समजावून सांगा!

नवी दिल्ली | लोकांमध्ये जा आणि त्यांना सोप्या शब्दात अर्थसंकल्प समजावून सांगा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना दिले आहे. त्यामुळे मोदींना आगामी लोकसभेसाठी तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. 

अर्थसंकल्प मांडल्यानंतर भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांसह खासदार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी यासंदर्भात आदेश दिले. 

अर्थसंकल्पात लोककल्याणकारी योजना आहेत, सामाजिक न्याय मिळवून देण्याचं लक्ष्य आहे, कमजोर वर्गाच्या कल्याणाची चर्चा आणि त्यावर ठोस मार्ग आहे, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवा, असं मोदींनी आपल्या खासदारांना सांगितलं आहे.