बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; मोदींचं मराठीत ट्विट

नवी दिल्ली | आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराजांची जयंची मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!, असं त्यांनी मराठीत ट्वीट केलं आहे.

भारत मातेच्या महान सुपुत्रांपैकी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. शौर्य, करुणा आणि उत्तम प्रशासक याचे मुर्तीमंत उदाहरण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाजारांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजही त्यांचे जीवनकार्य लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असं ट्विट मोदींनी केलं आहे. तसेच महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शूर योद्धा आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून आपली छाप पाडली. एक मजबूत आरमार उभं करण्यापासून ते लोकाभिमूख धोरणे आखण्यापर्यंत शिवाजी महाराज सर्व क्षेत्रात उत्कृष्ट होते. महाराज अन्याय आणि दहशत पसरवणाऱ्यांना विरोध करण्याच्या त्यांच्या भूमिकेसाठी नेहमीच स्मरणात राहील, असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

 


ट्रेंडिंग बातम्या-

शिवरायांवरील स्टेटस व्हिडीओ टिकटाॅकसह सोशल मीडियात ठरतायेत सुपरहिट

“माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार राहतील”

महत्वाच्या बातम्या-

…तर 26/11चा हल्ला ‘हिंदू आतंकवाद’ मानला गेला असता; राकेश मारियांचा धक्कादायक खुलासा

अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो- उद्धव ठाकरे

शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिली खास मानवंदना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More