Top News

‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच

देहरादून | देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून अजबगजब प्रकारही समोर येत आहे. उत्तराखंड सरकारमधील मंत्र्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी आरती लॉन्च केली आहे.

सध्या ही आरती सोशल मीडियावरील लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. मात्र मंत्र्याच्या या कार्यावर उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गरिमा दसौनी यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.

उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्याने संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा अपमान केला आहे. मोदी एक माणूस आहेत आणि त्यांना देवी-देवतांच्या श्रेणीत स्थान दिले जाऊ शकत नाही. मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात, असा आरो गरिमा दसौनी यांनी केला आहे.

जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात, असं गरिमा यांनी म्हटलंय. गरिमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्याकडे या प्रकाराची दखल घेत या दोघांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत प्रत्येक नागरिकावर

महत्वाच्या बातम्या-

‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण

लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…!

राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या