बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, आमच्यासाठी जीवन- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, पण आमच्यासाठी ते जीवन आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी निवेदन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. याला उत्तर म्हणून काँग्रेस सदस्यांनी महात्मा गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी हे फक्त ट्रेलर असल्याचं म्हटलं. यावर मोदींना तात्काळ वरील उत्तर दिलं.

मोदींनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकांनी केवळ सरकार बदललं नाही, तर देशात बदल होण्याची अपेक्षा ठेवली. त्यामुळे आम्हाला निवडून दिलं, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. भाजप सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या काळात अनेक विकास कामं राबवली. त्यामुळेच जनतेने आमच्यावर विश्वास दाखवत पुन्हा निवडून दिलं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

हिंदूंसाठी धर्म आस्थेचा विषय, तर संघासाठी धर्म म्हणजे धंदा- कन्हैया कुमार

“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”

महत्वाच्या बातम्या-

पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

पवारांमुळं, ‘भूखंडाचं श्रीखंड’ शब्द महाराष्ट्राला मिळाला- माधव भंडारी

प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More