Top News देश

फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

केवडिया | फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, “शेजारील देशातून काही दिवसात ज्या काही बातम्या आल्या आहेत. ज्या प्रकरे तेथील संसदेत सत्य स्विकारले गेले, त्यामुळे या लोाकांचा खरा चेहरा देशासमोर आला आहे”.

गुजरातमधील केवडिया येथे एकता दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना त्यावेळी नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. या दरम्यान मानवतेची खरी ओळख शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच आहे. कोणाचेही कल्याण दहशतवाद आणि हिंसेने कधीही होऊ शकत नाही, असंही मोदी त्यावेळी म्हणाले आहेत.

मोदी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता म्हणाले की, “हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे पुलवामा हल्ल्यानंतर केल्या गेलेल्या राजकारणावरुन स्पष्ट झाले आहे. त्यावेळी कशा प्रकारचे वक्तव्य केले गेले, हे देश कधीही विसरु शकणार नाही”.

मी राजकीय पक्षांना विनंती करतो, की अशा प्रकारचे राजकारण देशाच्या सुरक्षतेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करुन करु नका. आपण आपल्या स्वार्थासाठी नकळत देशविरोधी शक्तीच्या हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करु शकाल, ना आपल्या पक्षाचे, असंही मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही- अशोक चव्हाण

सर्व सामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण करू नका; गृहमंत्र्यांचे आवाहन

“हिंमत असेल तर अनाधिकृत हॉटेलं तोडून दाखवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या