चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | चौकीदार आता थांबणार नाही. चौकीदार एकालाही सोडणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. रामलिला मैदानात भरलेल्या भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते.

काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे याची कल्पना आहे. शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2004च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपायी जर पंतप्रधान झाले असते तर देश आणखी उंचीवर गेला असता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग