माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

जयपूर | गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील करतारपूर गुरुद्वारावरून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. विरोधकांच्या टिकेला मोदींनी चांगलेच उत्तर दिलं आहे.

काँग्रेसची प्रत्येक घोडचूक सुधारण्याचं काम माझ्या नशिबी आलंय आणि माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहेत, असं मोदींनी म्हटलं. ते राजस्थानमधील हनुमानगड येथील सभेत बोलत होते. 

भारताच्या फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवलं असतं तर करतारपूर भारतापासून वेगळं होऊन पाकिस्तानात गेलं नसतं, असा घणाघात मोदींनी केला आहे.

दरम्यान, सत्तेचा मोह आपण समजू शकतो. परंतु सत्तेसाठी काँग्रेसनं केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागतेय, असंही मोदींनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर

-राम मंदिरावरून धमक्या देणाऱ्या मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करू!

-राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट रचतोय!

-‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’