पोलिसांनी रोड शो नाकारला, मोदींचं चक्क सी-प्लेननं टेकऑफ

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला अहमदाबादमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र यावर नामी उपाय काढत पंतप्रधानांनी चक्क सीप्लेननं उड्डाण केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साबरमती नदीतून मेहसाणा जिल्ह्यातील धरोई धरणापर्यंत सी प्लेननं प्रवास केला. त्यांच्या या प्रवासाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

विशेष बाब म्हणजे सीप्लेननं उड्डाण घेण्यासाठी साबरमती नदीमध्ये पुरेसं पाणी नव्हतं, मात्र खास मोदींच्या प्रवासासाठी या नदीत पाणी सोडल्याचं कळतंय. आता यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.