“नरेंद्र मोदींनी ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘गुजरात फाईल्स’ची प्रसिद्धी करावी”
नवी दिल्ली | देशात द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सुरू झालेलं राजकारण अद्यापी थांबलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर फाईल्सची स्तुती केल्यानंतर विरोधकांनी त्यांना घेरलं होतं. आता देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोदींना सल्ला दिला आहे.
मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला नाही. पण नक्की पाहणार आहे. मोदींनी काश्मीर फाईल्सची स्तुती केली होती. त्याअगोदर राणा नावाच्या लेखकांनी गुजरात फाईल्सवर फार चांगलं लिखाण केलं आहे. त्यांनी देखील चित्रपट काढलेला आहे, असं शिंदे म्हणाले आहेत.
मोदींनी गुजरात फाईल्सची देखील प्रसिद्धी करावी आणि बॅलन्स राखावा, असा सल्ला शिंदे यांनी मोदींना दिला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपट हा नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या पंडीतांच्या निर्वसनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं भाजप आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींना कश्मीर फाईल्स चित्रपटावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्यापेक्षा यु-ट्युबवर प्रदर्शित करण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी दिग्दर्शकांकडं केली होती.
थोडक्यात बातम्या –
ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…
ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
राहुल गांधींचा मोठा दावा म्हणाले, “श्रीलंकेसारखं भारतातील सत्य देखील…”
Raj Thackeray : “राज ठाकरेंना अटक करून तुरूंगात टाका”
वसंत मोरेंना पदावरून काढताच रूपाली ठोंबरेंचा धक्कादायक खुलासा
Comments are closed.