बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. परंतु विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा (Rajyasabha) आणि लोकसभा (Loksabha) या दोन्ही सभागृहांचं कामकाज ठप्प आहे. देशातील वाढत्या महागाईने नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून महागाईवर चर्चा करण्यासाठी मागणी केली जात आहे. वाढत्या महागाईवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे तयार झालेल्या परिस्थितीवर आता पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. विरोधी पक्षाला देशहित जपायचं नाही, त्यांना देशापेक्षा अधिक आपल्या पक्षाचं हित महत्वाचं आहे. त्यामुळे ते कामकाजात गोंधळ घालत आहेत. समाजवादी पक्षाचे माजी राज्यसभा खासदार हरमोहन सिंग यादव (Harmohan Singh Yadav) यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.

विरोधकांना देशाचं हित नको आहे. त्यांना त्यापेक्षा आपल्या पक्षीय हित महत्वाचं आहे. विरोधक देशाच्या विकास कामात अडथळा करत आहे. हेच लोक जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी घेतलेल्या निर्णयांची ते अंमलबजावणी करु शकले नाहीत. त्यामुळे ते आता आम्ही सत्तेत असताना आम्हाला कामं करु देत नाहीत, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

काँग्रेस (Congress) संसदेत देशातील महागाईवर (Inflation) चर्चा करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. महागाई विरोधात त्यांनी सभागृहात फलक घेऊन आंदोलन केलं, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधानांनी सभागृहात महागाई आणि खाद्यपदार्थांवर वाढत्या जीएसटी (GST) किंमतींवर भाष्य करण्याची मागणी काँग्रेस खासदारांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं

जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…

राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर

अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More