नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?

Narendra modi l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सभा होत आहेत. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळे येथे सभा पार पडली. मात्र यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठं आश्वसन दिलं आहे. तसेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास पाहिलं काम काय करणार हे देखील सांगितलं आहे.

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती :

राज्यात काँग्रेसची सत्ता कित्येक दिवस होती. मात्र त्यांच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. अशातच आता राज्यात डबल इंजिन सरकार जोरदार काम करत असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तसेच आता गुंतवणुकीसाठी देखील महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

याशिवाय राज्यात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच मी केले होते. तसेच त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली होती. त्यावेळी मी सुद्धा काही बोललो नाही. मात्र आता ज्या दिवशी महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी होईल त्यानंतर आम्ही राज्यसरकारसोबत आम्ही बैठक घेऊ. तसेच त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा होईल असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले आहेत.

Narendra modi l महाविकास आघाडीच्या गाडीला चाकं नाहीत :

राज्यातील महाविकास आघाडीच्या गाडीला चाकं व ब्रेक नाहीत. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी देखील महाविकास आघाडीमध्ये भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात आधी सरकारला लुटण्याचा काम केलं आहे. मात्र त्यानंतर विकास कामे देखील थांबवली आहेत.

यासोबतच महाविकास आघाडीने मेट्रोची काम रोखली होती. तसेच समृद्धी महामार्गाचे काम देखील थांबवले होते. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली असा हल्लाबोल देखील मोदींनी केला आहे.

News Title : Narendra modi speech in Dhule

महत्वाच्या बातम्या –

मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील

“ED पासून सुटका व्हावी म्हणून भाजपसोबत..”; छगन भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट

HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार