देशाच्या आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आता सीएंच्या हाती- मोदी

नवी दिल्ली | जीएसटी लागू झालाय. आता देशाच्या आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी सीएंच्या हाती आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सीएंसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

अर्थविश्वाचे नियोजन आता तुमच्या हाती आहे. तुम्हीच अर्थविश्वाचे ऋषी-मुनी आहात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असंही मोदी यावेळी म्हणाले. 

दरम्यान, बनावट कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरु केली असून ती अशीच सुरु राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या