बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगातल्या ‘या’ सर्वात मोठ्या स्टेडियमला दिलं जाणार नरेंद्र मोदींचं नाव!

अहमदाबाद | जगातील सर्वात मोठं स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात आलं आहे. सध्या या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं ‘मोटेरा स्टेडियम’ आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. या स्टेडियमचं नामांतर करण्यात आलं आहे.

जगातील सर्वात मोठं स्टेडियम असं नामलैकीक मिळवलेलं मोटेरा स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखलं जाईल. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रिडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा उपस्थित होते.

हे स्टेडियम सरदार पटेल स्पोर्टस इन्क्लेव्हचा भाग आहे. या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम तर मैदानात 11 खेळपट्या आहेत. आधुनिक अशा एलईडी लाईट्स देखील मैदानात बसवण्यात आल्या आहेत. जय शहा राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना या स्टेडियमची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या स्टेडियमवर 1 लाख 10 हजार लोक सामना पाहू शकतात.

नरेंद्र मोदी यांच नाव स्टेडियमला दिलं गेल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सरदार पटेल यांच्या नावावर मत मागणारी भाजप आता लोहपुरूष सरदार पटेल यांचा अपमान करत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सज्जनसिंग वर्मा यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

कुत्रा चावल्याच्या रागातून तरूणाने कुत्र्याचाच घेतला जीव!

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा!

सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!

‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More