मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निकालात ‘नमोनमो’चा गजर पाहायला मिळाला. ‘फिर एक बार मोदी सरकार’ देशातल्या जनतेने हे ठरवलं आणि तसंच केलं. 303 जागा मिळवून भाजपने विरोधकांची दयनीय अवस्था केली. मोदी पंतप्रधान होणार हे आता निश्चित झालं आहे.
30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार असल्याचं कळतंय. त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील याच दिवशी होणार असल्याचं समजतंय.
संपूर्ण देशात नरेंद्र मोदी नावाचा करिश्मा तुफान वेगात चालला आणि त्याचाच परिणाम म्हणजे देशात भाजपच्या 303 जागा विजयी झाल्या.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाचा समावेश असणार? कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचं असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव
-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!
-शिवसेनेच्या संभाव्य 4 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव
-मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील भाजपचे ‘हे’ उमेदवार झाले विजयी
–मुंबईत महायुतीची बाजी; काँग्रेस राष्ट्रवादी भुईसपाट
Comments are closed.