Narendra Modi l उद्या 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा सोहळा काही खास असणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा :
बुधवारी संध्याकाळी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर संपर्क झाला. यादरम्यान नरेंद्र मोदींनी नेपाळच्या पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. नेपाळच्या पंतप्रधानांनीही फोनवरून आपल्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनीही बुधवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले.
श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान मोदींचे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या निवडणुकीत विजयाबद्दल फोनवरून अभिनंदन केले. याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 8 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ढाका येथून रवाना होणार आहेत.
Narendra Modi l एनडीएला 293 जागांसह बहुमत मिळाले :
18व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 293 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे, तर विरोधी पक्ष आघाडीने 234 जागा जिंकल्या आहेत. यापूर्वी 8 जून रोजी शपथविधी होणार होता. मात्र आता हा शपथविधी सोहळा उद्या म्हणजेच 9 जूनला होणार आहे.
राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, 09 जून 2024 रोजी सायंकाळी 7.15 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी NDAच्या घटकपक्षांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानंतर एनडीएला बहुमत मिळणार आहे.
News Title – Narendra Modi swearing-in ceremony
महत्त्वाच्या बातम्या
राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा
आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही
‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी
फडणवीसांना कितव्या रांगेत बसवलं?, दिल्लीतील गोष्टीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा
नितीश कुमार मोदींच्या पाया का पडले?, ‘या’ 4 कारणांची जोरदार चर्चा