बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच आपला भारत स्वावलंबी होईल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात येईल. या पॅकेजमध्ये देशातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही असेल, असं मोदी म्हणाले आहेत.

स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलंय.

पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. तरच आपला भारत स्वावलंबी होईल, असं मोदी म्हणाले आहेत.

जीव वाचवायचा आहे आणि पुढे वाटचालही करायची आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असणार आहे, असंही मोदींनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी

पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

महत्वाच्या बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More