बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | मंत्रिमंडळ विस्तार करण्यापूर्वी एकूण 12 मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागचं कारण सांगितलं आहे.

12 मंत्र्यांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा काहीही संबंध नाहीये. व्यवस्थेमुळे हा बदल करण्यात आला आहे, असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राजीनाम्यांवर भाष्य केलं आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा काहीही संबंध नाही. आता या अनुभवी असलेल्या मंत्र्यांकडून शिकण्यासारखं तुमच्याकडे आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून चौघांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत एक नवी ओळख बनवण्यावर भर देण्यास सांगितलं. तसेच आपल्या मंत्रालयाच्या संदर्भातील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना बाबत एक चिंताही व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ नव्या विषाणूचा होतोय शिरकाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More