नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत बजेट सादर केला. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा बजेट भारताच्या आत्मविश्वासाला जागरुत करणारा आहे. त्याचबरोबर हा बजेट जगात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे, असं मोदी म्हणालेत.
बजेटमध्ये सर्वांचा विचार करण्यात आला आहे. हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल. त्याचबरोबर या बजेटमध्ये सर्वसामान्यांवर कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
या बजेटमध्ये तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना एक बिझनेस पॉवर बनवण्याच्या दृष्टीकोनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे. या बजेटमुळे युवकांना ताकद मिळेल, असंही मोदी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे
‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका
सरकारचा कंपन्यांना दिलासा; पीएफसंदर्भात निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा
“निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजप निवडणूकीचा जाहीरनामा”
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित
Comments are closed.