बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा”

नवी दिल्ली | सुरक्षेचं कवच कितीही उत्तम असेल, कितीही आधुनिक असेल, सुरक्षेची कितीही हमी असेल तरीही कोरोनाचं युद्ध जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत शस्त्र टाकू नका. मास्क घालूनच घराबाहेर पडा. सण-उत्सवाच्या काळात अधिक सतर्क राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

कोणताही भेदभाव न करता विक्रमी लसीकरण करुन दाखवलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतंही व्हीआयपी कल्चर घुसू दिलं नाही. यामध्ये सगळ्या देशवासियांचे प्रयत्न होते, असं सांगतानाच मेड इन इंडियाची ताकद सर्वांत मोठी, हे देशाने पुन्हा एकदा दाखवून दिलं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

जोपर्यंत युद्ध सुरु आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेऊ नका, मास्क वापरत राहा. शूज घातल्याशिवाय जसे आपण घराबाहेर पडत नाही. तसेच मास्क घातल्याशिवया घराबाहेर पडू नका, असं आवाहन ही नरेंद्र मोदींनी केलं.

भारत कोरोना व्हॅक्सिन तयार करेल का? भारत आपल्या देशातील लोकांची काळजी कशी घेणार? सर्वांना लस देईल का असे प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने सर्वांना लस दिली. मोफत दिली. कोणतीही रक्कम घेतली नाही, असं त्यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More