Top News

कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | जेव्हा भारतात कोविड 19 वरील लस उपलब्ध होईल तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यात येईल, यातून कोणीही सूटणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

सणांच्या दिवसात लोकांनी अधिक जागरूक असलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल, असंही मोदींनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा

खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार!

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो, अशी चूक पुन्हा होणार नाही- जान कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या