Top News

कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदींनी बैठकीत सांगितलं.

काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

केंद्र आणि राज्याची पथकं लस वितरणाची तयारी करत आहेत. आमच्याकडे अनुभवी नेटवर्क सज्ज आहे. लस वितरणासाठी राष्ट्रीय तज्ज्ञ गट नावाचा एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.

जनतेला डोळ्यासमोर ठेवून लसीची किमत ठरवली जाईल. भारताने इतर देशांच्या तुलनेत कोरोनाला चांगला लढा दिला. लस दृष्टीक्षेपात असताना, लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, जो आपण यापूर्वीही दाखवला आहे. अशा वेळी देशविरोधी अफवा पसरवल्या जातात. मात्र राजकीय पक्षांनी जनतेला अफवांपासून वाचवायला हवं, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही”

“आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही”

“संयम, शिस्त दाखवली हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे”

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’; सोलापुरच्या शिक्षकाचं तुकाराम मुंढेंकडून कौतुक

14-15 डिसेंबरला मुंबईत होणार हिवाळी आधिवेशन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या