Top News देश

‘सेवा परमो धर्म’ मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना नमन- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | ‘सेवा परमो धर्म’ मानणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना नमन करतो. कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांच्या कुटुंबीयांना बाधा झाली, काहींना तर आपला जीवही गमवावा लागला त्या सर्वांना मी नमन करतो. मला विश्वास आहे आपण हे कोरोना युद्ध जिंकू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत भाषणाला सुरूवात केली.

पुढील वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करु, त्यामुळे पुढील 2 वर्ष आपल्याला 130 कोटी जनतेसोबत काही महत्त्वाचे संकल्प करायचे आहेत, असं मोदींनी सांगितलं आहे.

कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या खात्यातील 15 कोटी कुठं गेले?; एक ‘मोठा’ व्यवहार माहीत झाला आहे!

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा योगायोग, की… या गोष्टीची एकच चर्चा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या