नवी दिल्ली | एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज आहे. राष्ट्राच्या हितात राजकारण नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त केवडियामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.
एक राष्ट्र, एक निवडणूक ही आजच्या काळाची गरज आहे. दर काही महिन्यांनंतर देशात कुठेतरी निवडणुका होत असतात, त्यामुळे यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आता आपण संपूर्णपणे डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि कागदाचा वापर थांबविला पाहिजे, असं मोदी म्हणाले.
राज्यघटनेचे संरक्षण करण्यात न्यायपालिकेची फार मोठी भूमिका आहे. आणीबाणीच्या कालावधीनंतरही यंत्रणा देखील बळकट झाली, आम्हाला त्यातून बरेच काही शिकायला मिळाले, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल
“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही?”
‘लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवारांचं विठूरायाच्या चरणी साकडे
‘क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा’; प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स