देश

शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक साद घातली आहे.

शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकते. संवादाचं द्वार नेहमीच खुलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत म्हणाले.

शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नसला तरीही आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी यावर चर्चा करावी. शेतकरी आणि माझ्यात केवळ एक कॉलचं अंतर आहे, असं मोदींनी म्हटलंय.

दरम्यान, गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत!

‘मी आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घेऊ का?’; अजित पवार भडकले

‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, सगळे डिटेल्स देतो’; अण्णांचा शिवसेनेला इशारा

सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण!

“2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या