बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील सशक्त लोकाशाहीमुळे एक चहा विकणारा चौथ्यांदा आमसभेत भाषण देतोय- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड परिषद झाल्यानंतर मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील काल भेट घेतली. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मोदी यांनी आज भाषण केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश असून या लोकशाहीमुळेच एक चहा विकणारा चौथ्यांदा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण देतोय, असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

भारतातील विविधता ही भारताची ताकद आहे भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे, असं भाष्य मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही मोदींनी भाष्य केलं. तसेच मोदी यांनी आपल्या तब्बल अर्ध्या तासाच्या भाषणात भारताची संस्कृती, परंपरा आणि मोदी सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कामाची माहिती जगाला दिली.

थोडक्यात बातम्या- 

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता पण…- छगन भुजबळ

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More