नवी दिल्ली | नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून संवाद साधत देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मोदींनी जवानांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात.
आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असं आवाहन मोदींनी केलंय.
आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारत मातेच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारत मातेसाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा प्रज्वलित करू. मी जवानांना सांगू इच्छितो की तुम्ही भलेही सीमेवर असाल. पण संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
लवकरच सणासुदीला सुरुवात होईल. कोरोनाचं संकट असल्यानं सण संयमानं साजरे करा आणि वस्तूंची खरेदी करताना देशात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
महत्वाच्या बातम्या-
“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”
कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत
आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…
चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत
“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”
Comments are closed.