नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी, अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करणं आणि मोठय़ा संख्येत एकत्र येणं टाळावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलं. सध्याच्या परिस्थितीबाबत आपलं सरकार पूर्णपणे दक्ष असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.
सर्वाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व मंत्रालयांनी आणि राज्यांनी नानाविध उपाययोजना केल्या आहेत. व्हिसा स्थगित करण्यापासून ते आरोग्यविषयक क्षमता वाढवण्यापर्यंतच्या उपायांचा यात समावेश आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
घाबरून जाऊ नका, पण खबरदारी नक्कीच घ्या. केंद्र सरकारचा कुठलाही मंत्री येत्या काही दिवसांत परदेशात जाणार नाही. अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळा, असं आवाहन मी देशवासीयांना करतो, असंही मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात सांगितलं.
दरम्यान, मोठ्या संख्येत एकत्र येणं टाळून आपण करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडू शकतो आणि सर्वाची सुरक्षितता निश्चित करू शकतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराला ठाकरे सरकारची मंजुरी
रावसाहेब दानवेंच्या मुलीविरोधात पोलिसांत तक्रार; शिवीगाळ, धमकी दिल्याचा सासूचा आरोप
महत्वाच्या बातम्या-
नरवीर तानाजी मालुसरेंच्या कार्याचा ठाकरे सरकारकडून सन्मान; जन्मस्थळासाठी 5 कोटींची घोषणा
युरोपियन लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
आमदारांच्या ड्रायव्हरचा पगारही आता सरकार देणार
Comments are closed.