Top News देश

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

Photo Credit- Facebook/ narendra Modi

लखनऊ | नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे ठरतील आणि जे लोक या नव्या कायद्यांबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत त्यांना हे शेतकरीच उघडे पाडतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

लढावू राजे सुहेलदेव यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

आधीच्या सरकारने सन्माननीय योद्धे आणि नेत्यांचा सन्मान न केल्याची चूक आमचं सरकार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे असतील आणि नव्या कायद्यांमुळे चांगले अनुभव हे उत्तर प्रदेशातून येत आहेत, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका!

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं ‘हे’ प्रसिद्ध गाणं!

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या