बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या 100 वर्षीय आईनेही लस घेतली, घाबरू नका- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये राजेश हिरावे या नागरिकाला फोन करून त्याच्याशी चर्चा केली. हिरावे ने सांगितलं की, व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज येत आहेत, त्यामुळे लसीची भीती वाटत आहे. यामुळे लसीकरणाला गेलो नाही. यावर माझ्या 100 वर्षीय आईनेही कोरोना लस घेतली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी आज 78 व्या मन की बात कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. गेले वर्षभर, रात्रंदिवस एक करून संशोधकांनी यावर काम केलं आहे. यामुळे आपल्याला विज्ञानावर विश्वास ठेवायला हवा. कोरोना लस घेतल्यामुळे काही होत नाही, असं समजवायला पाहिजे, असं मोदींनी सांगितलं.

मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिल्खा सिंग यांची देखील आठवण काढली आहे. कोरोनानं मिल्खा सिंग यांना आपल्याकडून हिरावलं. मी त्यांच्याशी बोललो होतो. तेव्हा ते मला म्हणाले होते की, मी ऑलिम्पिक खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी तयार आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

कोरोनाविरूद्ध आपल्या देशवासियांचा लढा चालू आहे, पण या लढाईत आम्ही एकत्रितपणे अनेक विलक्षण टप्पेही साध्य करत आहोत. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने अभूतपूर्व काम केले आहे. 21 जूनपासून लस मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशात 86 लाखांहून अधिक लोकांना मोफत लस देण्याचा विक्रमही झाला आणि तेही एकाच दिवसात, असं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार- शरद पवार

औरंगाबाद हळहळलं; शस्त्रक्रीया करताना डाॅक्टरला ह्रदयविकाराचा झटका

मलायका अन् अर्जुनचा फोटो शेअर करत ‘या’ अभिनेत्याने सलमान खानला डिवचलं

“सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही, महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही”

नरेंद्र मोदींविरोधात बोलल्याने योगी सरकारने महसूल अधिकाऱ्याला केलं निलंबित!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More