Top News देश

भंडाऱ्यातील मन सुन्न करणाऱ्या घटनेवर मोदीही हळहळले; म्हणाले…

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील भंडारामध्ये जिल्हा सरकारी रूग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांना आपला जीव गमवाव लागला. मन सुन्न करूण टाकणाऱ्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही हळहळले आहेत.

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

जे बालक जखमी झाले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असंही मोदींनी म्हटलं आहे. यासंदर्भात मोदींनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, आग लागलेल्या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यातील सुदैवाने सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भंडाऱ्यातील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत- राजेश टोपे

गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे निधन

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या