देश

नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ते सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाईल, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक आज वाजता राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर आजच चर्चा होणार असून ते मंजूर करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्यकांना या विधेयकाच्या मंजुरीनंतर मोठा दिलासा मिळणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत दुपारी मांडलं जाईल आणि पुरेशा पाठिंब्यासह ते या सभागृहात मंजूर केलं जाईल, असा विश्वास संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या