बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली| कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळं देशात 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं. मागच्या दोन महिन्यापासून आपण कोरोनाबाबत बातम्या ऐकत आहोत. या आजारापासून वाचण्यासाठी संकल्प आणि संयम हा एकच उपाय आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

देशातील सगळ्या जनतेनं कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकानं सावध राहणं गरजेचं आहे. मला कधी देशातील जनतेनं नाराज केलं नाही. आज मी सगळ्या देशातील जनतेला एक मागणं मागायला आलो आहे. मला तुमचे काही आठवडे हवे आहेत, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी टाळा, जितकं शक्य होईल तेवढं घराच्या बाहेर जाणं टाळा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं टाळा, तसंच घरी बसून जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन पंतप्रधानानी जनतेला केलं आहे.

येत्या 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं मोदींनी देशातील जनतेला यावेळी सांगितलं. रविवारी कोणीही घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती मोदींनी यावेळी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’… कुणीही घराबाहेर पडू नका- पंतप्रधान मोदी

कोरोनावर एकच मंत्र काम करेल, ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’- नरेंद्र मोदी

रामदेव बाबा टाकणार तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; केली कंपनीची स्थापना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More