ना ट्रम्प, ना पुतीन, ना जॉर्डनची महाराणी; इंस्टाग्रामवर हवा फक्त नरेंद्र मोदींची!

मुंबई | इंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो शेअरिंग अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा असल्याचं दिसून आलं आहे. इंस्टाग्रामवर ते जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेता ठरले आहेत.

इंस्टाग्रामवर नरेंद्र मोदींचे एकूण १५.५ दशलक्ष एवढे फॉलोअर्स आहेत. तर त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचा नंबर लागतो. त्यांचे १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता इंस्टाग्रामवर कमी आहे. त्याचा तिसरा क्रमांक लागतो. १०.९ दशलक्ष त्यांचे फॉलोअर्स आहेत.

चौथ्या क्रमांकावर पोप फ्रांसिस आणि पाचव्या क्रमांकावर जॉर्डनची महाराणी क्वीन रनिया यांचा क्रमांक लागतो. रनिया ही कुवैतमध्ये जन्मलेली एक साधारण मुलगी होती, त्यानंतर ती महाराणी बनली. ४८ व्या वर्षी देखील ती एखाद्या तरुणीप्रमाणे दिसते.

महत्वाच्या बातम्या-

-मोदीजी, एक पत्रकार परिषद घेऊन दाखवा; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान  

-चारा नसेल तर तुमची जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा; राम शिंदेंचा संतापजनक सल्ला  

-५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही- अमित शहा  

-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?  

-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”