बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही मागे टाकलं

नवी दिल्ली | जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाली होती पण पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा पुन्हा एकदा सातासमुद्रापारही डंका वाजला आहे. जगभरातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विश्वनेते बनले आहेत.  अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने नुकताच एक सर्व्हे केला आहे.

या सर्व्हेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच अपडेट करण्यात आला. 70 टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात लोकप्रिय नेते होण्याचा मान पटकावला आहे. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मागे टाकलं आहे. 2020मध्ये नरेंद्र मोदींची अप्रुव्हल रेटिंग 84 टक्के होती. पण कोरोना काळात त्यांच्या लोकप्रियतेत घसरण पाहायला मिळाली होती.

पण नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा डंका पुन्हा एकदा वाजला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉय मॉरिसन, ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन, ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनैरो, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी तर महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राधअयक्ष जो बायडन यांनाही पंतप्रधान मोदींनी मागे टाकलं आहे.

या सर्व्हेत जो बायडन पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेले आहेत तर बोरीस जॉन्सन यांची दहाव्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील लोकप्रिय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागे टाकत या सर्व्हेत विश्वनेत्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा जगभर चर्चा होत आहे.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

“नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा”

“नवाब मलिकांना हे आजच कसं सुचलं? एक महिना काय झोपले होते का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More