Narendra Modi Vijay Chauk1 - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा सुरक्षाविषयक नियम धाब्यावर
- देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा सुरक्षाविषयक नियम धाब्यावर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवून आपला जीव धोक्यात घातला. विजय चौकात बिटींग रिट्रिट सोहळ्यादरम्यान हा प्रकार घडला. 

सोहळा पार पडल्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती रवाना झाले. मोदींची रवाना होण्याची वेळ आल्यावर त्यांनी गाडीत बसण्याऐवजी लोकांजवळ जाणं पसंत केलं. 

दरम्यान, मोदी उपस्थितांमध्ये गेल्यानंतर सुरक्षारक्षकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. संध्याकाळ असल्याने प्रकाश मंद होता, त्यामुळे सुरक्षारक्षकांनी मोठी फौजच मोदींभोवती वेढा घालून उभी होती. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा