गांधीनगर | अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारताकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवरुन होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा सोहळा सर्वात मोठा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाला लाखो लोक हजेरी लावणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. ट्रम्प आपल्यासोबत असतील हे आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असं मोदी म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
ट्रम्प यांचे सकाळी 11.40 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ट्रम्प यांचा 22 किलोमीटरचा रोडशो असणार आहे.
ट्रम्प यांनी ट्विट करत आपण भारतभेटीसाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. तसेच जवळजवळ 1 कोटी भारतीय माझ्या स्वागतासाठी असतील, असं मोदींनी सांगितल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान, द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ट्रम्प यांची भारत भेट महत्वाची मानली जात आहे.
India awaits your arrival @POTUS @realDonaldTrump!
Your visit is definitely going to further strengthen the friendship between our nations.
See you very soon in Ahmedabad. https://t.co/dNPInPg03i
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
ट्रम्प महाराष्ट्रात आले असते तर आधी ‘शिवथाळी’ चाखली असती- संजय राऊत
ठाकरे सरकारनं कौतुक करावं असं कोणतंही काम केलेलं नाही- पंकजा मुंडे
जेएनयूत घुसलेल्या अतिरेक्यांचं काय झालं?; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
महत्वाच्या बातम्या-
माझ्या खिशातल्या पैशानं मी आत्तापर्यंत दोनच व्यक्तींसाठी हार विकत घेतलाय- नितीन गडकरी
छत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या अफजलखानाचे वंशज नवाब मलिक यांच्या रूपानं जिवंत- अवधुत वाघ
Comments are closed.