बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील”

मुंबई | देशभर कोरोनाने हैदोस घातला असताना वाढत्या प्रादुर्भावामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केलं असल्याची टीका केली. याचाच धागा पकडत पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांना प्रश्न केला असता त्यावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र  भाजपने आज मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली. बैठकीनंतर पाटलांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टीकेचे बाण सोडत अनेक विषयांवर भाष्य केलं.

राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लॉकडाऊननंतर आढावा घेऊन निर्णय घ्यायचा असतो, पण आत्ताच पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल अशी भाषा करत आहेत. मराठा समाज शांत बसणार नाही, भाजप पाठींबा देईल. मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवला जात आहे, मराठा आंदोलन पेलवणार नाही, झेपणार नाही, त्यामुळे ही खेळी केली जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

दरम्यान, भाजप महाराष्ट्राने घेतलेल्या बैठकीला भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, विनायक मेटे उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेत्री गौहर खानने शेअर केला पतीसोबतचा बेडरूममधील व्हिडीओ, व्हिडीओ तुफान व्हायरल

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या- शरद पवार

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! लेकीनेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

‘त्या’ प्रकरणात कृष्ण प्रकाश यांच्यावर कुणाचा दबाव?, पिंपरीत जोरदार चर्चा

खंडणी प्रकरणामुळे राष्ट्रवादीने हाकललेल्या मंगलदास बांदलविरोधात नवा गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More