Top News खेळ

‘इतिहासामध्ये तुझं नाव….’;पंतप्रधान नरेंद्र मोदींचं धोनीला खास पत्र

नवी दिल्ली |  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनी याला पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे.

धोनीने हे पत्र ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत. धोनी त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, “एका सैनिकाला, खेळाडूला तसंच कलाकाराला कौतुक हवं असतं. त्यांची इच्छा असते की त्यांच्या कार्याची आणि मेहनतीची दखल घ्यावी. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी आभारी आहे.”

धोनीला लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोंदी म्हणतात, “तुझ्यामध्ये भारताचा आत्मा दिसून येतो. 15 ऑगस्टला तु अतिशय साधेपणाने व्हिडीयो शेअर करत निवृत्ती जाहीर केलीस. मात्र 130 कोटी भारतीय तुझ्या निर्णयाने नाखूश झाले. तू भारतीय टीमच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस. सर्वश्रेष्ठ फलंदाज, कर्णधार यांच्यात तुझ्या नावाचा समावेश होतो. मात्र गेले 15 वर्ष जे भारतासाठी केलंय त्यासाठी आम्ही सर्व आभारी आहोत.”

शनिवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर धोनीपाठोपाठ त्याचा कट्टर मित्र सुरेश रैनाने देखील निवृत्ती घेतली.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना वाहिली आदरांजली

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये ‘या’ शहराची बाजी; मुंबई-पुण्याचा नंबर कितवा?

मोबाईल बनवणारी ‘ही’ मोठी कंपनी सर्व व्यवसाय भारतात स्थलांतर करण्याच्या तयारीत!

‘नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने…..’; कंगणाचं दीपिका पादुकोणवर टीकास्त्र

भारतात पाहिजे तिथे नोकरी शोधण्यासाठी मदत; गुगलकडून ‘हे’ खास अ‌ॅप लाँच

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या