बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचा उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईत विकास कामं जलद गतीने करण्यासाठी भाजप (Bjp) आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या, असं आवाहन नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना केलं आहे.

येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

दरम्यान, मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागायला हवी. तो पैसा भ्रष्टाचारात लागेल, विकासाला रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचा विकास कसा होईल?, असं मोदी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-