नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर

Narendra Modi

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 जून) नवीन NDA सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.

मोदी सरकारकडून खातेवाटप करण्यात आलं आहे. अर्थात हे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही. पण याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदींचं मंत्रिमडळ जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ते विकास आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री देण्यात आलं आहे. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आलं आहे.

गेल्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आता बिहारच्या जितन राम मांझी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कुणाला कुठलं खातं?

अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही”, मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

“…तर शिवसेना एकत्र येईल”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन!

दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर

पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .