बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं’; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत मोदींचं शायरीतून सूतोवाच

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय गुपकार नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं होतं. राजकीय मतभेद असतील. मात्र राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवं, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाल्याचं कळतंय.

जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचं आहे. एवढंच नाही, तर दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूंं, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत. या बैठकीत या सर्वपक्षीय नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या.

जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही, असं सांगत आम्ही पूर्ण राज्याची मागणी केलीय. पंतप्रधान मोदी लोकशाहीला बळकट करण्याची भाषा करतात. सरकारने जम्मू काश्मीरमध्ये पंचायतींच्या निवडणुका घेतल्या, जिल्हा परिषदेच्याही निवडणुका घेतल्या, विधानसभा निवडणूक घेणार नाही असं कसं होऊ शकतं. त्यामुळे आम्ही जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक तातडीने करण्याची मागणी केली. निवडणुका घेऊन लोकशाही पुन्हा स्थापित केली पाहिजे, असं गुलाम नबी आझाद म्हणालेत.

भाजपच्या अजेंड्यावर कलम 370 हटवण्याचा विषय होता, तर त्यांनी कायद्याप्रमाणे जम्मू काश्मीरच्या विधानसभेत हा विषय का ठेवला नाही. मोदी सरकारने विधानसभेला डावलून असंवैधानिकपणे कलम 370 हटवलं. सरकारला असा बेकायदेशीर आणि असंवैधानिक निर्णय घेण्याचा काहीही अधिकार नव्हता. केंद्र सरकारने बेकायदेशीरपणे कलम 370 हटवलं. आम्ही याला कायद्याने आणि संविधानाच्या मार्गाने पुन्हा प्रस्थापित करु, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे, मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?”

“पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प आहेत का?”

“नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली”

विनायक मेटेंना शिवीगाळ करत, मराठा आरक्षण बैठकीत शिवसैनिकांचा राडा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More