बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संगीत क्षेत्रातही नरेंद्र मोदी नावाचा डंका! आता ‘नरेंद्र’ नावाच्या रागाची निर्मिती

पुणे | पुणे तिथं काय उणे हे वाक्य सर्वत्र प्रसिद्ध आहे. याचीच प्रचिती आता पुणेकरांना आली आहे. राजकारणातच नाही तर आता संगीत क्षेत्रातही नरेंद्र राग आळविला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, वैचारिक चिंतनासह कार्यकर्तृत्व याचं वर्णन करणाऱ्या नरेंद्र नावाच्या अनोख्या संगीत रागाची निर्मिती गायिका डॉ. रेवा नातू यांनी केली आहे.

हिंदूस्तान शास्त्रीय संगीत हे परिवर्तनशील आहे. सृजनशील कलाकार चिंतन आणि साधनेतून संगीतात नाविन्यपूर्ण प्रयोग होत असतात. रंजकता आणि सृजनशीलता शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वत्र जनसामान्यांच्या काळजात घर केलं आहे. ते पंतप्रधान झाल्यावर देशात सकारात्मक विचारांची पेरणी झाली. ते मन की बात या आपल्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत प्रत्येकाची दखल घेतात. तसेच देशातील जनतेला प्रोत्साहित करत असतात’, असं डॉ. रेवा नातू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींनी देशात योग दिनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांच्याप्रती आदर आणि सन्मानसाठी आपण नरेंद्र या रागाची निर्मीती केली आहे, असं डॉ. रेवा नातू यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

पाकिस्तानची चिंता वाढली! ‘या’ 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

“ठाकरे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे…”

…तर मी राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More