बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

नवी दिल्ली | देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्यासाठी विदेशी रणनीती खूप महत्वाची असते. भारताची विदेश निती ही पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ताकदवान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची विदेश निती मजबूत करण्यावर नेहमीच भर दिला आहे. आता नरेंद्र मोदी हे 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत.

नरेंद्र मोदी गुरूवारी अमेरिकेच्या वाशिंग्टन विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेने सर्व तयारी केलेली पहायला मिळाली. भारतीय नागरिक सुद्धा  मोठ्या प्रमाणात आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू सुद्धा यावेळी उपस्थीत होते.

100 हून अधीक नागरिक मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. मोठ्या उत्साहात मोदी यांचं स्वागत केलं आहे. नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणाद्वारे मोदी भारतीय विदेश नितीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यांशी सुद्धा चर्चा करणार आहेत.

अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या सोबत मोदी अनेक विषयांवर चर्चा करतील. क्वाड देशांच्या नेत्यांसोबत मोदी चर्च करणार आहेत. आपल्या सुरक्षा घेऱ्यातील गाडीतून उतरून मोदी यांनी उपस्थीत नागरिकांकडून स्वागत स्विकारलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘या’ कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी; वैज्ञानिकांचा दावा

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More