बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले कुंभमेळ्यातील सर्व संतांचे आभार!

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशात हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झालं असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे.

आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचं संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं. यामुळे या संकटाविरोधातील लढाईला एक ताकद मिळेल, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

हरिद्वारमध्ये शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभात कोरोनाचा विस्फोट झालेला आहे. निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांसह जवळपास 68 साधू संतांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर कपीलदेव दास यांचं हरिद्वारमधल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. 65 वर्षाच्या महामंडलेश्वरांचं निधन कोरोनानं झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

सिनेसृष्टीला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More