गांधीनगर | भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक आरोप पाटीदार समाजाचे आमदार नरेंद्र पटेल यांनी केलाय.
हार्दिक पटेलचे निकटवर्तीय असलेल्या वरुण आणि रेश्मा पटेल यांच्यासोबतच नरेंद्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी भाजपला हादरा दिला.
१ कोटीपैकी १० लाख रुपयांची रक्कम अॅडव्हान्स देण्यात आली तसेच उर्वरित रक्कम सोमवारी (२३ ऑक्टोबर) देण्यात येणार होती. वरुण पटेल यांनीच ही ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केलाय.
Comments are closed.