बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

सातारा | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माजी शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेना का सोडली याचं स्पष्टीकरण देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झालं आहे, असा धक्कादायक खुलासा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. तर शिवसेनेत मला जाणीवपूर्वक डावललं जात होतं, असा आरोप देखील नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावर एकनाथ शिंदे यांना आणा, अशी माझी मागणी होती. त्याचबरोबर माथाडी कामगाराच्या मिटींगमध्ये माझ्या भुमिकेचा कोणताही विचार केला जात नव्हता. शिवसेनेत मला जाणीवपूर्वक डावललं जात होतं. त्यामुळं माझी पक्षात घुसमट होत होती. त्यामुळे मी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा विचार केला होता, असा खुलासा नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

केवळ अनिल देशमुख हेच अपघाताने मंत्री झालेत असं म्हणता येणार नाही तर, संपुर्ण महाविकास आघाडी सरकारचं हे अपघातानं स्थापन झालं आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या सरकारचं पोलीस विभागावर नियंत्रण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेला पाठीशी घालत होते. त्यामुळेच कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो हे समोर आलं आहे, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीच माझी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड केली होती. त्यामुळे आता मी भाजपसाठी काम करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेनेनं संधी द्यायला पाहिजे होती, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More